


Price: ₹250 - ₹175.00
(as of Mar 30,2025 12:32:46 UTC – Details)
Buy Now
From the Publisher
The Art Of War by Sun tzu

इतरांशी असलेल्या संघर्षामुळे वा अंतर्द्वंद्वामुळे आपले आयुष्य कसे झाकोळले जाणार नाही याचा मार्ग दाखविणारे, आध्यात्मिक बैठक असलेले असे छोटेखानी तेरा धडे या पुस्तकात आहेत.
आध्यात्मिकतेचा कोणताही मार्ग तुम्ही अनुसरत असाल किंवा नसाल तरीही सन त्झु याची ही प्राचीन विचारसरणी प्रत्येकास एकसारखीच लागू आहे. तुमच्या तीव्र स्पर्धात्मक जीवनात संघर्ष हाताळण्याचा परिणामकारक, आध्यात्मिक व सहानुभूतिपूर्ण मार्ग शिकायचा असेल, जीवनातील ध्येयाची स्पष्ट अनुभूती करून घ्यायची असेल व अत्यंत बिकट परिस्थितीतही मनःशांती अनुभवायची असेल तर ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
‘‘कोणत्याही संघर्षाच्या प्रसंगी उद्विग्न न होता शांतिपूर्ण व विवेकी मार्गाने तो लवकरच कसा संपविता येतो, हे या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आपली विचारसरणी व जीवनशैली अधिक समृद्ध, संघर्ष व तणावविरहित करण्यासाठी वाचकांनी या पुस्तकाचे मनन करून आपले स्वतःचे नवनवीन मार्ग काढावेत व जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग शोधावा.
– व्यंकटेश उपाध्ये
लौकिकार्थाने फारसा प्रसिद्ध नसलेला, सैन्यातील अधिकारी व त्याचबरोबर पंडित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सन त्झु नावाच्या चिनी व्यक्तीने ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे शीर्षक वाचल्यास हे पुस्तक युद्धात वापरायच्या डावपेचांबद्दल आहे असे वरकरणी वाटते. हे पुस्तक क्रौर्यास उत्तेजन देते असाही एक लोकप्रिय आणि प्रचलित असा गैरसमज आहे;परंतु हे खरे नाही.
एवढेच नाही तर पुस्तकाचे नाव ‘दी आर्ट ऑफ वॉर’ असूनही हे पुस्तक युद्धशास्त्राबद्दल नाही तर हे पुस्तक नीतिमत्तेबद्दल, सहिष्णुतेबद्दल आहे. जीवनात संघर्षाचा सामना करावा लागला तरीही आक्रमक भूमिका न घेता संघर्ष कसा टाळावा, उभय पक्षांची हानी टाळून कशा प्रकारे मार्ग काढावा याबद्दल प्रकांड विचारशीलता आणि बुद्धिमत्तेचा वापर करीत सल्ला दिला आहे.
हे पुस्तक इतके जुने असूनही त्याने आपला कालातीतपणा सिद्ध केला आहे. आजही त्याचा अभ्यास जगभरातील सैनिकी विद्यालयांत केला जातो. यातील डावपेच, युद्धातील परिस्थितीबरोबरच इतर पार्श्वभूमीवर व युद्धेतर परिस्थितीतदेखील परिणामकारक सिद्ध होतात.
तुमच्या तीव्र स्पर्धात्मक जीवनात संघर्ष हाताळण्याचा परिणामकारक, आध्यात्मिक व सहानुभूतीपूर्ण मार्ग शिकायचा असेल, जीवनातील ध्येयाची स्पष्ट अनुभूती करून घ्यायची असेल व अत्यंत बिकट परिस्थितीतही मनःशांती अनुभवायची असेल तर ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Customer Reviews
—
4.3 out of 5 stars 22
4.4 out of 5 stars 344
4.7 out of 5 stars 4
4.4 out of 5 stars 20
4.4 out of 5 stars 303
Price
— no data ₹210.00₹210.00 ₹117.00₹117.00 ₹111.78₹111.78
— no data ₹100.00₹100.00
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 January 2013); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar, 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 200 pages
ISBN-10 : 817786842X
ISBN-13 : 978-8177868425
Item Weight : 200 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar, 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
Buy Now